logo

शिवाजी विद्यालय रिसोड या ठिकाणी स्व.आप्पासाहेब सरनाईक यांचा स्मृतिदिन साजरा

*स्व.आप्पासाहेब सरनाईक यांचा स्मृतिदिन साजरा*

रिसोड(प्रतिनिधी)
बहुजनांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे या उदात्त हेतूने 1961 मध्ये स्व.ॲड.आप्पासाहेब सरनाईक यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम च्या रूपाने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून या वटवृक्षाच्या सानिध्यात असंख्य मुले शिकून समाजामध्ये उच्च पदांपर्यंत पोहोचले आहेत असे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित स्व.ॲड.आप्पासाहेब सरनाईक यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना प्राचार्य संजय देशमुख यांनी केले.
यावेळी मंचावर प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य संजय नरवाडे, पर्यवेक्षक गजानन भिसडे, ज्येष्ठ शिक्षक खुशाल राठोड, ज्येष्ठ शिक्षिका शोभा राऊत, प्रा.अरुण लिमजे, मराठी प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन देशमुख, व उर्दू प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम स्व.ॲड.आप्पासाहेब सरनाईक व स्व. मालतीबाई सरनाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य संजय देशमुख म्हणाले की, ज्या काळामध्ये शिक्षणाची सुविधा फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होती अशा काळात त्या वेळच्या वाशिम तालुक्यात शिक्षणाची गंगा आणून आप्पासाहेबांनी बहुजनांच्या मुलांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्याचबरोबर त्याच काळामध्ये उर्दू माध्यमाच्या शाळेची स्थापना करून मुस्लिम बांधवांसाठी शिक्षणाचे दालन सुरू केले आणि म्हणूनच आज आपण पाहतो की श्री शिवाजी शिक्षण संस्था,वाशिम ही वाशिम जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था बनली आहे, तसेच आज शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, माजी प्राचार्य अरुणदादा सरनाईक, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.स्नेहदीप दादा सरनाईक यांच्या माध्यमातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढतच आहे. यावेळी उपप्राचार्य संजय नरवाडे, पर्यवेक्षक गजानन भिसडे, प्रा.संतोष खानझोडे, डिगांबर पाचरणे यांनी तसेच विद्यार्थ्यांनी स्व.आप्पासाहेब सरनाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.विजय देशमुख यांनी केले तर आभार प्रा.उत्तम मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
256 views