logo

बाबरूड़ (राणिचे) येथे "लोकसेवा क्लिनिक"चे उद्घाटन....!

बाबरूड़ (रा.) येथे "लोकसेवा क्लिनिक"चे उद्घाटन
डॉ. हारून पठाण यांच्याकडून बालरोग व जनरल फिजिशियन सेवा सुरू
तालुका प्रतिनिधी :-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने बाबरूड़(रा.) येथे "लोकसेवा क्लिनिक"चा शुभारंभ करण्यात आला आहे. या क्लिनिकमधून डॉ. हारून पठाण (B.U.M.S – MUHS नाशिक, रजिस्ट्रेशन क्र. I-119558-D) यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ तसेच जनरल फिजिशियन सेवा सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना लहानसहान आजारांसाठी दूर शहरात जावे लागू नये, तसेच वेळेवर उपचार मिळावेत, या सामाजिक भावनेतून डॉ. हारून पठाण यांनी आपल्या गावातच ही सेवा सुरू केली आहे. लहान मुलांचे आजार, ताप, सर्दी-खोकला, पोटदुखी, संसर्गजन्य आजार, तसेच सर्वसाधारण आजारांवर येथे योग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत

.
लोकसेवा क्लिनिकमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून सकाळी व संध्याकाळी नियमित तपासणीची सुविधा देण्यात येत आहे. आधुनिक तपासणी पद्धती, रुग्णांशी आपुलकीने संवाद आणि योग्य औषधोपचार ही या क्लिनिकची वैशिष्ट्ये आहेत.
गावातच दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने बाबरूड़ (रा.) तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून डॉ. हारून पठाण यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसे च या उद्घाटनप्रसंगी गावातील माझी पंचायत समिति सदस्य ललितभाऊ वाघ, ग्राम सदस्य, मनोज वाघ,सिलोड हुन आलेले डॉक्टर शाहरुख़ पठान, अब्दुल पठान,हारून पठान,आसिफ पठान,डॉक्टर उपस्थित होते, तसेच गावातील उपस्थित, गुलाब मेंबर, नूरमोहमद हसरत,महमूद मेंबरमसूद मेवाती,गफूर मेवाती,सरदार मेवाती,नबी मेवाती,मजूर मेवाती, गफूर मेवाती,याक़ूब मेवाती,सरदार मेवाती, परमेश्वर कोकने,प्रवीण देवरे, सोपान तड़वी,हारुन मेवाती,आसिफ मेवाती(मेडिकल) व गावतील ग्रामस्त मोट्या प्रमानात उपस्थित होते

5
507 views