logo

पत्रकार दिनी "तालुका पत्रकारांतर्फे "सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार " @सुवर्णकन्या श्वेता कोवेही सन्मानित

तालुका पत्रकारांतर्फे "सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार "

@सुवर्णकन्या श्वेता कोवेही सन्मानित

अहेरी,.......
समाजाला माहिती देऊन जागृत करण्याचे, शिक्षित करण्याचे व लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणारी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटनेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्थानिक संत मानवदयाल अनुदानित आश्रम शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून दुबई येथे तिरंदाजी स्पर्धेत प्यारा गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकाविणारी श्वेता भास्कर कोवे, बबलू भैया हकीम, आशिषभाऊ पिपरे, शाहीन भाभी हकीम, डॉ.किरण वानखेडे, वनपरिक्षेत्राधिकारी गौरव गणवीर व जावेद अली यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वितोंडे होते व प्रमुख मार्गदर्शक व बक्षीस वितरक म्हणून पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे होते.
26 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा 15 केंद्रावर आयोजित केली होती. त्यात तालुक्यातून जय बाळू बांगरे, कार्तिक गंगाधर तोकला व इतर केंद्रनिहाय विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांना प्रशस्तीपत्र, पदक व रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल,स्मृतिचिन्ह देऊन संघटनेतर्फे सन्मानित करण्यात आले.
यापूर्वीही तालुका पत्रकार संघटनेने राजाराम मध्ये 860 मुलांना,ताटीगुडम येथे 126 विद्यार्थ्यांना तर पेरमिली केंद्रातील सहा प्राथमिक शाळेतील 652 चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील 1हजार 868 विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा, देवलमारी व अहेरी केंद्रातील अनुक्रमे 907 व 812 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,1हजार 471 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेऊन बक्षीस वितरण आज करण्यात आले.
यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे, उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सचिव रमेश बामनकर,साई चंदनखेडे,डॉ शंकर दुर्गे,मुन्ना कांबळे,श्रीधर दूगिरालापाटी, उमेश पेंद्याला, बबलू सडमेक,दीपक चूनारकर, राहुल दुर्गे, शहाजी रत्नम,व्यंकटेश चालूरकर संतोष बोम्मावार, गणेश शिंगरेड्डीवार, श्रीकांत दुर्गे,सालय्या कंबलवार यांनी मेहनत घेतली.
संचालन सचिव रमेश बामनकर, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे तर आभार मोसमचे सालय्या कंबलवार यांनी केले.

17
5462 views