logo

प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. माधवराव गाडगीळ यांचे निधन; पश्चिम घाट संरक्षणाचे शिल्पकार हरपले

प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पदक विजेते डॉ. माधवराव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री येथे हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आयुष्यभर समर्पित असलेल्या या वैज्ञानिक नेतृत्वाने महाराष्ट्र आणि देशभरातील पर्यावरण धोरणांना नवे आयाम दिले. त्यांच्या जाणीने पर्यावरण क्षेत्रात मोठा मानसिक धक्का बसला आहे.गाडगीळ समितीच्या क्रांतिकारी शिफारशी
महाराष्ट्र शासनाने कोकण आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे डॉ. गाडगीळ अध्यक्ष होते. या 'गाडगीळ समिती'ने २०११ मध्ये सादर केलेल्या अहवालात अनेक महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या.कोकण आणि पश्चिम घाटातील वृक्षतोड पूर्णपणे बंद करणे आणि पर्यटन विकासावर नियंत्रणे घालणे.नद्या, जलस्रोत आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी 'नो डेव्हलपमेंट झोन' घोषित करणे.शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांद्वारे जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धनाचे अभिनव उपक्रम राबवणे.या शिफारशींमुळे पश्चिम घाटातील पर्यावरणीय संकटावर प्रभावी उपाययोजना शक्य झाल्या, जरी अंमलबजावणी पूर्ण झाली नसली तरी.शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द
डॉ. गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे आणि मुंबई विद्यापीठांतून जीवशास्त्रात पदवी मिळविल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून 'मॅथेमॅटिकल इकॉलॉजी' विषयात पीएचडी केली. हार्वर्डच्या आयबीएम संगणन केंद्र आणि उपयोजित गणित शाखेचे ते फेलो होते. १९७३ ते २००४ पर्यंत बेंगलुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस'ची स्थापना केली. स्टॅनफर्ड आणि बर्कली विद्यापीठांत पाहुणे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी योगदान दिले.पश्चिम घाट आणि संशोधनातील योगदान
'गाडगीळ आयोग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ पॅनलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी परिसराचा सखोल अभ्यास करून अहवाल शासनाकडे सादर केला. लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र आणि मानवी-पर्यावरण संबंध या क्षेत्रांत त्यांचे संशोधन जगविख्यात आहे. केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पर्यावरणाप्रती त्यांची तळमळ आणि वैज्ञानिक दूरदृष्टी कायम स्मरणात राहील.पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याची आठवण करून श्रद्धांजली वाहिली असून, पुण्यात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

11
1114 views