
10 व 11 जानेवारी रोजी
श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आयोजित परिचय मेळावा
नांदेड दि. 7 -
येथील श्री नगरेश्वर वैश्य मंदिर, सराफा च्यावतीने दि. 10 व 11 जानेवारी 2026 रोजी गुंडेगावकर मंगल कार्यालय, उस्माननगर रोड येथे 52 वा आंतरराज्य उपवधू-उपवर परिचय मेळावा संपन्न होणार असून दोन दिवशीय मेळाव्यात संपूर्ण देशपातळीवरून उपवर-उपवधू व त्यांचे पालकवृंद हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष भागवत गंगमवार व मेळावाप्रमुख साईनाथ दमकोंडवार यांनी दिली.
यावेळी उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, उपाध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, उपाध्यक्ष सुधीर पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव मामडे, प्रसिद्ध उद्योजक प्रशांत पालदेवार यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
दि. 11 जानेवारी रोजी द्वितीय सत्रात सकाळी 7.30 ते 10 स्नेहमीलन परिचय सत्र होणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड राजकुमार मुक्कावार, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी जि.प. श्रीमती वंदना फुटाणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पईतवार यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी आर्य वैश्य समाज बांधवांनी परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त विवाह जुळवून यावेत, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष बिपिन गादेवार, सचिव सुरेश कोटगिरे, कोषाध्यक्ष पांडुरंग येरावार, सहसचिव सतीश मुक्कावार, सहसचिव शंतनु कोडगिरे, प्रसिद्धीप्रमुख विजय बंडेवार आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.