logo

शिरूर ताजबंद ग्रामपंचायत ला नगरपंचायत चा दर्जा मिळणार ? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी . सहकार मंत्री पाटील यांच्या कडून कौतूक

तातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कडून ७१ लाखांची विक्रमी वसुली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहीम यशस्वी .
(नगरपंचायत चा दर्जा मिळणार ?)
लातूर ( विशेष प्रतिनिधी )
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद ग्रामपंचायत यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दिनांक २१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत राबविण्यात आलेल्या वसुली मोहिमेत तब्बल ७१ लक्ष रुपयांची कर वसुली करून विक्रमी कामगिरी केली आहे. ह्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिरूर नगरीचे भूमिपुत्र तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कौतुक केले.

ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी पंकज शेळके, विस्तार अधिकारी रमाकांत पट्टेवार, विस्ताराधिकारी सुळे यांच्या मार्गदर्शन व योग्य नियोजनामुळे शक्य झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे यांनी नमूद केले.
आदर्श सरपंच मच्छिंद्र वाघमारे,
उपसरपंच सुरजभैय्या बाबासाहेब पाटील यांच्या यशस्वी नियोजनात , बांधकाम सभापती युवराज मंचकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, सभापती प्रा . किशन कापसे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे त्यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, लिपिक तोफीक किनिवाले, गंगाधर बैकरे, मारोती सरवदे सह सर्व कर्मचारी त्यांच्या प्रभावी समन्वयातून एकत्रितपणे काम करत ही उल्लेखनीय वसुली साध्य केली.

ग्राम पंचायत प्रशासनामार्फत मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर तसेच इतर थकबाकी वसुलीसाठी नियोजनबद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली होती. प्रसिद्धी व थकबाकीदार नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

वेळेवर कर भरण्यामुळे गावाच्या विकासकामांना गती मिळणार असून पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण विशेष करवसुली मोहिमेत ७१ लाखांहून अधिक रकमेची वसुली होणे ही ग्रामपंचायत शिरूर ताजबंद साठी अभिमानास्पद बाब असून इतर ग्रामपंचायतींसाठी ही प्रेरणादायी ठरेल असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

78
6925 views