logo

युथ फाउंडेशनतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी...!


काटोल प्रतिनिधी :-
(युथ फाउंडेशन न्यूज)
स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त युथ फाउंडेशनतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युथ फाउंडेशनचे संचालक विद्धेश्वर उर्फ बंडूजी गजबे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनीलजी नारनवरे सर, भागवतजी पाटील सर, युथ फाउंडेशनचे सीईओ दीपकजी ढोके सर उपस्थित होते. तसेच विकास सोमकुवर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. लक्ष्मीबाई शेंडे, संध्याताई सहारे यांची विशेष उपस्थिती लाभली.
युथ फाउंडेशन संचालित सेंट्रल पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री सक्षमीकरणाच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

54
3526 views