
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खंडाळा (खु.) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
काटोल प्रतिनिधी:-
काटोल तालुक्यातील खंडाळा (खुर्द ) येथे दि. 03/01/2026 रोज शनिवार ला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे तसेच समाज कल्याण नागपूर यांच्यावतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खंडाळा ( खुर्द ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. जीवन भेलकर सर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहनजी पांडे सर -तालुका समतादूत काटोल हे होते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर संचालन उदय ब्राम्हटकर वर्ग 5 वी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कु. सविता दुहीजोड, सौ ज्योती वलके, काटोल तालुका समतादूत श्री मोहन पांडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून आलेल्या विद्यार्थिनी कु. नेहा भादा, कु. आराध्या उईके, कु. नंदिनी परतेती यांनी मार्गदर्शन केले. तसेच वर्ग 4 थीचे कु. योगीश्री आहाके, कु. प्रेरणा सहारे, वर्ग 3 रा च्या कु. आराध्या, कु. हिना उईके, कु. खुशबू उईके व कु. आचल परतेती या विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मोहन पांडे सर यांनी संविधान अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत संविधानातील मूलभूत कर्तव्य व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आभार प्रदर्शन वर्ग 6 वी चा सक्षम ढोके यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील संपूर्ण विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. सामूहिक संविधान वाचन घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.