सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा.
महान समाजसुधारिका व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन, साकोली जिल्हा भंडारा येथे बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालिकांच्या शिक्षणाचे महत्त्व, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी भाषणे, कविता व विचार मांडणीद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी बालिकांना प्रेरणादायी संदेश देत शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बीएड चे सर्व प्रशिक्षणार्थी तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले