logo

प्रभाग क्रमांक 26 (ड) मध्ये काँग्रेसचे सद्दाम शेख मैदानात

प्रतिनिधी ०३ जानेवारी (नाशिक) :- नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या चालू आहेत. प्रभाग क्रमांक 26 (ड) मधून काँग्रेसचे सद्दाम शेख मैदानात उतरले आहेत. सद्दाम शेख हे गेल्या पंधरा वर्षांपासून समाजकार्य करत आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी नागरिकांना मदत केली आहे. यामध्ये रक्तदान, ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जलसुरक्षा व जलवितरण भविष्याची गरज, राष्ट्रीय स्तरावर नदीजोड प्रकल्प, कचराकुंडीचा वापर करून सुंदर परिसर निर्माण करू. रस्ते मार्ग, वाहतूक सेवा आणखी सुधारणा तसेच सर्व नागरिकांना उत्तम मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रात मदत केलेली आहे हे कार्यक्रम राबवले आहेत असे काँग्रेसचे उमेदवार सद्दाम शेख यांनी सांगितले. या निवडणुकीमध्ये उमेदवार सद्दाम शेख विरोधकांचा कसा सामना करतात हे पाहणे आपल्याला महत्त्वाचे असणार आहे.

91
1839 views