logo

भिमा कोरे शौर्य दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांची सेवा हीचखरी जनसेवा बाळासाहेब वंजारे


फुलगाव / प्रतिनिधी : गौतम पाटोळे
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी २०८ व्या शौर्यदिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांची सेवा करणे हीच खरी जनसेवा असल्याचे मत युवा कार्यकर्ते व उद्योजक, फुलगाव विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक श्री. बाळासाहेब यशवंतराव वंजारे यांनी व्यक्त केले.
पेरणे पंचक्रोशी व श्री. बाळासाहेब वंजारे मित्र परिवार, येरवडा (पुणे–६) यांच्या संयुक्त विद्यमाने भिमा कोरेगाव येथे २०८ व्या शौर्यदिनानिमित्त आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत पिण्याचे पाणी, पोहे, केळी वाटप, अन्नदान तसेच स्नानासाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आयोजक व कार्यकर्त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
या सेवाभावी उपक्रमामुळे आलेल्या अनुयायांनी समाधान व्यक्त केले. नागपूर, अकोला, अमरावती, मुंबई तसेच पुणे जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी श्री. बाळासाहेब यशवंतराव वंजारे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तळागाळातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार असणारा २०८ वा शौर्यदिन हा भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक रणसंग्रामाची आठवण करून देणारा दिवस आहे. या निमित्ताने सर्व शुरवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. महसूल विभाग, पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, पोलीस मित्र संघटना, होमगार्ड, पुणे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमपीएमएल, राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
२०८ व्या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सुमारे २० लाख आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहून मानवंदना दिली.

8
176 views
  
1 shares