logo

आज जग आतंकवादाच्या संकटाने हैराण झाले आहे - प्रा.जगदीश देवरे


गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा स्मारक येथे पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २१५ वे पुष्प गुंफताना प्रा.जगदीश देवरे फुलपाखरू या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी दिशोत्तमा प्रकाशनचे संचालक रवींद्र पाटील होते.
प्रा.जगदीश देवरे पुढे म्हणाले की, सामान्य माणूस दहशतवादाला कसा बळी पडतो याचे चित्रण या कादंबरीत रेखाटले असून, दक्षिणगंगा गोदावरी तिच्यावर बांधलेले गंगापूर धरण या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला, नाशिक शहर पूर्णपणे उध्वस्त करू पाहणारे भयानक कारस्थान कोण होते हे दहशतवादी कसे बनले त्यांनी हे कुठलं जाळं त्यांचा छडा लागला का? की आजही त्याची छुपी कारवाई चालूच आहे. नाशिक वरची ही टांगती तलवार हटली की नाही या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार वेगवान नाट्यमय घटना फुलपाखरू या कादंबरीत
मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी भरत क्षत्रीय, दीपक भामरे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. आभार सुहास टिपरे यांनी मानले तर राजेंद्र देसले यानी सूत्रसंचालन केले.

4
190 views