सावनेर सेवेकरी परिवाराची सुप्त उपक्रम
*सेवेकरी परिवाराचे सुप्त उपक्रम*
*श्रमदानातून रोड दुभाजक व कडेच्या वढलेल्या झाडी झुडपी काढले*
*आम्ही सेवेकरी,सावनेर पोलीस उपविभाग, सावनेर पोलीस, महामार्ग पोलिस,हितज्योती आध र फाऊंडेशन, सह अन्य समाजसेवी युवकांचा सहभाग*
*सावनेर ः हेटी पोलीस चौकी पासून सावनेर शहरात येणाऱ्या रोड वरती वाढलेली झाडें तसेच रस्त्याच्या बाजुला वाढलेली बारीक झुडपे याबाबत मागच्या कित्तेक महिन्यापासून महामार्ग पोलीस चौकी प्रभारी, हितज्योती आधार फाऊंडेशन चे हितेश बनसोड, सावनेर उपविभागीय पोलीसांनी पत्र-व्यवहार करत सदर बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आनुन दीली त्यावर आम्ही लवकरच उपाययोजना करून देऊ असे आश्वासन मिळत होते व यात भरपूर कालावधी लोटत सदर रस्ता हा दुर्घटना स्थळ बनत असल्याचे चित्र आहे*
*संबंधित विभागाची अजून किती दिवस वाट पाहाची कारण स्पॉट ची गंभीरता लक्षात घेता ते त्वरित साफ करणे, झाडें कापणे अत्यंत गरजेचे झाले होते.त्याकरिता "सावनेरचे आम्ही सेवेकरी"गु्पचे भुषण कुबडे,महेश टेकाडे, निखील पोटभरे,अभिषेक गहरवार,हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड,हेटी सावंगी चे सरपंच अशोक डवरे आदिंनी सदर झाडे झुडपी श्रमदानातून काढण्यासाठी प्रयत्न चालवत सावनेर पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सागर खर्डे,सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक उमेश पाटील, पाटनसावंगी महामार्ग पोलीस चौकी हेटी च्या सुहासिनी शहस्त्रबुद्धे,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, सावनेर पोलीस व हेटी महामार्ग पोलीस यांचे कर्मचारी आदिंच्या उपस्थितीत दि.28 डिसेंबर 2025 लि सकाळी 8-00 वाजता पासुन श्रमदानाला सुरुवात करण्यात आली व बघता बघता सदर डार्क पाँईंट वरिल झाडी झुडपी नाहिसे होत रस्ता सुरळीत होऊन भविष्यात तेथे रस्ते अपघात होणार नाही अश्या आशा पुलकित होऊ लागल्या*
*सेवेकरी परिवाराच्या या संकल्पनेतून परिवारातील सर्व युवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या श्रमदानाला आपला अमुल्य वेळ देत हातभार लावत सामाजिक बांधिलकी चा परिचय दीला.*
*याप्रसंगी श्री गोतमारे सर ,सागर खंगारे, आजय महाजन, रुपये कमाले, बाल्या डवरे, शुभम डवरे, चेतन चांदेकर,भावेश वरखडे,चेतन हेलोंडे,मनिष कुबडे,भावेश वाखोरे, क्रीश भाई, आर्यन कातकडे,केशव मोहतकर,राहुल काळे ,विक्रम आचार्य,अभिषेक वानखेडे,अनुज सिरसागर,विकास अकोने,योगी आचार्य,काशीराव वानखेडे,सचिन मारसकोळे ,निलेश वाळके,सोनू धुर्वे,विनोद मरकाम,राहुल नाराते,मोरेश्वर धुर्वे,सुरेश आदमचे,पवन आडमाचे ,सहीत आम्ही सेवेकरी परिवार,हितज्योती आधार फाऊंडेशन,सावनेर व पाटनसावंगी महामार्ग वाहतूक पोलिस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*