logo

परतूरला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार परतूर (प्रतिनिधी) भाऊसाहेब पाटील मुके


राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा रविवारी युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
उद्धव मगर, अच्युत मगर यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ पार पडला.कपिल आकात यांच्या नेतृत्वात अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठे यश मिळाले आहे.या यशाबद्दल आकात यांचे समर्थक उद्धव मगर, अच्युत मगर यांनी आपल्या निवासस्थानी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक अंकुशराव तेलगड, विजय राखे, अखिल काजी, कदीर कुरेशी,रज्जाक कुरेशी,मुश्ताक,अन्सारी,संजय राऊत, हृषीकेश कऱ्हाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ. श्यामसुंदर आबूज,मोकिंद गायकवाड, भगवान काळे, निसार काजी, पुरुषोत्तम मगर,संदीप वाघमारे आदींची उपस्थिती होती.

11
1021 views