Mumbai Train : मुंबईची मेट्रो सुसाट, मोनो थकली सध्या नव्या मोनोगाड्यांची जुन्या प्रणालीसह जोडणी करण्याचे काम सुरू
Mumbai Train : मुंबईची मेट्रो सुसाट, मोनो थकलीसध्या नव्या मोनोगाड्यांची जुन्या प्रणालीसह जोडणी करण्याचे काम सुरूमुंबई : नमिता धुरीमेट्रो 2 ब मार्गिकेमुळे पूर्व उपनगरवासीयांना तर मेट्रो 9 मार्गिकेमुळे मिरा-भाईंदरकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे; मात्र हे स्वप्न 2025 या वर्षात अपूर्णच राहिले. याउलट, दक्षिण मुंबईला मात्र पहिलीवहिली भुयारी मेट्रो याच वर्षी मिळाली. याशिवाय मेट्रोचे तिकीट काढण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र वर्ष संपतासंपता मोनोने मान टाकली आहे.आरे ते कफ परेड या 33.5 किमी भुयारी मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा 2024 मध्ये सुरू झाला होता. त्याचा वरळीपर्यंतचा विस्तार मे 2025 मध्ये करण्यात आला. एवढेच नव्हे तर ऑक्टोबर 2025 पासून ही मेट्रो कफ परेडपर्यंत धावू लागली आहे. प्रवाशांचाही या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे नियोजीत भुयारी मार्गांवर पुढील वर्षांत भर दिला जाणार आहे.