जनता विद्यालयात वीर बाल दिवस
पिंपळगाव सराई | दि. २६ डिसेंबर २०२५स्थानिक जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे वीर बाल दिवस श्रद्धा व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या वीर पुत्रांनी धर्म, संस्कार व स्वाभिमानाच्या रक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा गायकवाड होत्या. प्रमुख वक्त्या प्रतीक्षा गुंड यांनी आपल्या प्रभावी भाषणातून वीर बालांचे शौर्य, त्याग व आदर्श मूल्ये विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. कार्यक्रमास पर्यवेक्षक संजय पिवटे तसेच ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का गवते व धनश्री कोरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरती पाटोळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन दिलीप शिंगणे यांनी केले. फलक लेखनाची जबाबदारी दशरथ चिभडे यांनी पार पाडली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धैर्य, त्याग व नैतिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.