logo

बीड | वाहिद नगरमध्ये दर शुक्रवार होणाऱ्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, AIMA MEDIA मुळे नागरिकांना मोठा दिलासा

बीड | वाहिद नगर परिसरात दर शुक्रवार वारंवार होत असलेल्या वीज खंडित होण्याच्या गंभीर समस्येचा अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या समस्येबाबत AIMA MEDIA चे प्रतिनिधी शेख गालिब यांनी थेट MSEB (महावितरण) च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांची अडचण ठामपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सतत होत असलेल्या वीज कपातीमुळे वाहिद नगरमधील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शुक्रवारच्या नमाजवेळी तसेच दैनंदिन कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत होता. ही जनसमस्या गांभीर्याने घेत AIMA MEDIA च्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांशी तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनंतर समस्येचे मूळ लक्षात घेऊन आज या समस्येवर कायमस्वरूपी उपाय (हल) करण्यात आला. महावितरणकडून आवश्यक सुधारात्मक पावले उचलण्यात आल्याने आता दर शुक्रवारची वीज कपात पूर्णतः थांबली आहे.
या तात्काळ आणि प्रभावी पुढाकारामुळे वाहिद नगरच्या नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी AIMA MEDIA चे मनापासून आभार मानत जनहितासाठी दाखवलेल्या या सक्रियतेचे कौतुक केले आहे.
जनतेच्या समस्या जबाबदारीने मांडून त्या सोडविण्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे.
— प्रतिनिधी, AIMA MEDIA
शेख गालिब
खूप-खूप आभार AIMA MEDIA | JAN JAN KI AWAAZ

17
791 views