logo

शिक्षणमहर्षी व भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी

स्थानिक : उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथे मराठी विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी व भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. के. नंदेश्वर होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये भाऊसाहेब देशमुख हे नवसृष्टीचे भाग्यविधाते असल्याचे गौरवोद्गार काढले. शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण विद्यालये, वस्तीगृहे, अनाथालय, व्यायामशाळा तसेच विधी व कृषी शाखांसह अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी उभे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते प्रा. विठ्ठल वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात भाऊसाहेब कृषिमंत्री असताना त्यांनी राबविलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा वेध घेतला. विशेषतः कर्जलवादाचा कायदा हा शेतकऱ्यांसाठी ईश्वरी वरदान ठरल्याचे ते म्हणाले. या कायद्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतीवर येणारे संकट दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. पी. खेडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित लाव्हरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप जुनघरे यांनी केले.
कार्यक्रमाला एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे, प्रा. टिकार, प्रा. डॉ. मेश्राम, प्रा. बुधवंत, प्रा. बाजड, प्रा. राऊत, प्रा. पाठक मॅडम, प्रा. राम जुनघरे, प्रा. साबळे, प्रा. बोंडे मॅडम, प्रा. पांढरे यांसह प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओकार पूरी, डॉ. नरवाडे, प्रा. मनवर, प्रा. प्रजापती, डॉ. काळे, गोपाल कोल्हे, संतोष घुगे, सुनील चराटे, सुरज नरवाडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

30
4987 views