logo

यशासाठी वाचनाचे तंत्र आत्मसात करा*- गुलशन बेलदार यांचे प्रतिपादन

*यशासाठी वाचनाचे तंत्र आत्मसात करा*-
गुलशन बेलदार यांचे प्रतिपादन

● स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे
उदघाटन श्री.गुलशन बेलदार(इग्नाईट
अकॅडेमी,पुणे) यांच्या हस्ते संपन्न
● अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन
जाधव हे होते
९० विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिलल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर या ठिकाणी एक आठवड्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० ते ०१ दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न झाले.
प्रस्तुत उदघाटन सत्राचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी भूषविले. तर यावेळी विचारमंचावर त्यांच्या समवेत अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष तथा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे समन्वयक डॉ.मुकेश भोळे याचप्रमाणे करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे संयोजक प्रा.विजय साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम -सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी,श्रीमंत- दानशूर प्रताप शेठजी,यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्याअर्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे मूळ प्रयोजन अर्थात, प्रास्ताविक करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शकाचा परिचय डॉ.जितेंद्र पाटील यांनी करून दिले. तदनंतर सन्माननीय मार्गदर्शकांचा सत्कार प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी डॉ.रवी बाळस्कर यांनी रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे यांचे देखील स्वागत केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक इग्नाईट अकॅडेमी, पुणे येथील श्री.गुलशन बेलदार यांनी विद्यार्थ्यांना तासभर स्पर्धा परीक्षा संबंधी सखोल स्वरूपाचे मार्गदर्शन केले. यामध्ये संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यास करण्याचे तंत्र समजावून सांगितले. ते म्हणाले की,आज विविध स्पर्धा परीक्षेचे प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे, आपण आपल्या क्षमतेनुसार पदाची तयारी करावी तेव्हा कुठे कौशल्याच्या आधारावर परीक्षा उत्तीर्ण करता येतात म्हणून आपलं कौशल्य कोणत्या पदासाठी उपयुक्त ठरू शकेल, हे पाहून संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या भरतीचे स्वरूप प्रारंभी समजून घ्यावे आणि त्यानंतर त्याचे सखोल अध्ययन करावे.
श्री.बेलदार पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर पदवी स्तरावर परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.केवळ रिल्स पाहून करिअर होत नाही तर व्यवहारास अद्ययावत कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.रोज दोन तास स्पर्धा परीक्षेची तयारी करावे त्याचप्रमाणे विविध विषयाच्या पुस्तकांचे अध्ययन तंत्र आत्मसात केल्यास परीक्षेत हमखास यश मिळण्याची शक्यता असते.
प्रस्तुत प्रसंगी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.विवेक बडगुजर,डॉ.हेमंत पवार, डॉ.रवी बाळसकर ,डॉ.बालाजी कांबळे, डॉ.किरण गावित,डॉ.अनिल झळके,डॉ.प्रियंका पाटील, डॉ.घरटे राखी, प्रा.अमोल अहिरे,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.भिका पावरा,प्रा.उमेश येवले, प्रा.सचिन आवटे,प्रा.दिलीप तडवी, प्रा.हिमांशू पाटील, प्रा.हिमांशू गोसावी यांच्यासह करियर कौन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाट,पराग रविंद्र पाटील, नंदूसिंग पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर,दितेश चिंचोरे,भूषण चौधरी, आफ्रिन पठाण,कल्पेश पाटील,प्रा.सोनूसिंग पाटील,प्रा.श्यामकांत बाविस्कर प्रा.हितेश निकुंभे हे उपस्थित होते आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एच.डी जाधव म्हणाले की,आयुष्याचे गणित नीटपणे सोडविणारे लोक पुढे जातात म्हणून आपण कष्ट घ्यावे परीपूर्णते नंतरच आपणास यश मिळते. माणसं ही जगात कर्तृत्वाने सुंदर असतात म्हणून स्पर्धा परीक्षा हे कर्तृत्व गाजविणारे मंच आहे, असे प्रतिपादन डॉ.एच.डी.जाधव यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.हेमंत पवार,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.प्रियंका पाटील,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.पुष्पा पाटील,डॉ.ज्ञानेश्वर कांबळे,हिमांशू गोसावी,अक्षय सोनार,प्रा.उमेश येवले आदींनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेचे संयोजक प्रा.विजय साळुंखे यांनी केले तर आभार डॉ.ज्ञानेश्वर मराठे यांनी मानले.
डॉ.धिरज वैष्णव यांनी विशेष सहकार्य केले,



21
1386 views