logo

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील “सूर्यमाळ “येथे महिला उद्योजक क्षमता बांधणी कार्यशाळा यशस्वी…..

दि.२२/१२/२०२५ रोजी
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME), महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) व युथ बिल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच Toshwa Vision Foundation यांच्या यशस्वी व प्रभावी व्यवस्थापनातून पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ येथे महिला उद्योजक क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात व यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेत Toshwa Vision Foundation चे संस्थापक श्री. विश्वास पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. हेमंत शिंगाडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांना उद्योगविषयक सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूर्यमाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गीता गवारी मॅडम यांनी मोलाची भूमिका बजावत सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या ममता बदादे, दीक्षिता पाटील व विश्वनाथ पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.
कार्यशाळेस गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सूक्ष्म उद्योगांचे व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, डिजिटल साक्षरता तसेच GeM पोर्टल या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिलांना उद्योग सुरू करताना आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये, सामान्य ज्ञान, सातत्य व धीर या घटकांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा (Success Stories) सादर करून महिलांना प्रेरणा देण्यात आली.

17
1250 views