logo

संगमनेर बस स्थानकात ‘मिशन साफ सफाई’ विजयी उमेदवार ची सुरुवात



अहमदनगर
संगमनेर


संगमनेर बस स्थानक : रात्री 11 वाजता.

संगमनेर शहराचा मुख्य रस्ता स्वच्छ झाल्यानंतर आता शहराचा मानबिंदू असलेल्या *संगमनेर बस स्थानकात ‘मिशन साफसफाई’ सुरू करण्यात आले आहे.

संगमनेर चे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शना खाली व आमदार सत्यजित (दादा ) सुधीर तांबे व संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ मैथिली सत्यजित तांबे यांच्या नवीन उपक्रमाने
एक आगळा वेगळा स्वच्छ सुंदर आपलं संगमनेर

रात्रीचे अकरा वाजत आले आहेत, नगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी सगळे एकत्र, शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता काम करत आहेत. रात्री अकराच्या सुमारास संगमनेरचे नगरपालिका नगरसेवक श्री गणेश भाऊ गुंजाळ. श्री नितीन भाऊ अभंग यांनी हाजीरी लावीत संगमनेर बस स्थानकाची साफसफाई करून एक आगळावेगळा विजयी कामाची स्वरूपात सुरुवात केली आहे

ही केवळ स्वच्छतेची मोहीम नाही. ही जबाबदारीची सुरुवात आहे.

बदल_झालाय
बदल_दिसतोय
संगमनेर स्वच्छ दिसायला सुरुवात झाली.

9
1174 views