logo

अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर धाड



जळगाव :

पिंप्राळा हुडकोमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी १२ गॅस सिलिंडर, २ इलेक्ट्रिक रिफिलिंग पंप आणि २ वजन काटे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव व अन्य सहकाऱ्यांचा समावेश होता.

0
98 views