logo

विभागीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडूंचे घवघवीत यश

विभागीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडूंचे घवघवीत यश
भामरागड ता.१७- एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच चंद्रपुरात पार पडल्या. यामध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसाच्या ९२ खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता; त्यापैकी ७२ विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले.तद्वतच ९ प्रकल्पातून भामरागड प्रकल्पाला विजेतेपदाचे प्रथम क्रमांकाचे चषक मिळवून दिले.
आदीवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चंद्रपुर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वयोगट १४, १७ व १९ वर्ष वैयक्तिक खेळ प्रकारात व सांघिक खेळात लोकबिरादरीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी घवघवीत योगदान दिले.
यामध्ये मैदानी खेळात. 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 3 किमी धावणे/ चालणे 4x100 रिले, 4x400 रिले, गोळा फेक, भाला फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले. 14 वर्ष मुली मुले खोखो, 17 वर्ष मुली मुले खोखो व 14 वर्ष मुली मुले हॅन्डबॉल 17 मुले व 19 वर्ष मुली हॅन्डबॉल खेळात यश प्राप्त केले. विभागीय क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सूरज दुर्वा (१७ वर्षे वयोगट) व रोशनी पुंगाटी (१९ वर्षे वयोगट) यांचा आदिवाशी विकास विभागातर्फे सत्कार करण्यात आला व सायकल भेट देण्यात आली. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाशभाऊ आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विवेक दुबे, हन्डबाल प्रशिक्षक अमोल बावनकर, ज्योती सडमेक यांचे अभिनंदन करून अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या संचालिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी, शरिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

121
5488 views