logo

श्रीनाथ विद्यालय बोरगाव आनंदी बाजार दिवस साजरा

श्रीनाथ विद्यालय बोरगाव मध्ये आनंदी बाजार दिवस साजरा!
प्रतिनिधी- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीनाथ विद्यालय बोरगाव मध्ये आनंदी बाजार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक राजेंद्र रेपाळ पर्यवेक्षक रामभाऊ लष्कर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करून आनंदी बाजार दिवसाचे थाटात उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे प्राथमिक धडे शाळा स्तरावरच मिळावेत, जगाच्या व्यवहारात आपला विद्यार्थी कुठेही कमी पडू नये, त्याच्या अंगी सर्व गुणसंपन्नता यावी हा शाळेत आनंदी बाजार भरवण्याचा मुख्य हेतू आहे असे उद्गार याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र रेपाळ यांनी काढले.
या आनंदी बाजारामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या जवळजवळ 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .या सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी विविध प्रकारचा भाजीपाला ,फळे, रानातील रानमेवा यामध्ये गावरान बोरे, ॲपल बोरे ,चिंचा, हरभरा, गाजरे, पेरू, सिताफळे ,रामफळे, देशी केळी व इतर साहित्य.तर खाण्यासाठी जवळजवळ 80 स्टॉल लावलेले होते.यामध्ये इडली सांबर, पाणीपुरी, व्हेज मंचुरियन, दही धपाटे ,थालीपीठ, भेळ, भात सांबर ,बिर्याणी ,व्हेज बिर्याणी, वडापाव, पुरी भाजी, समोसे, चहा, मसाला दूध इत्यादी .तसेच विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी उपलब्ध होती . या आनंदी बाजारामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी, पालक ,ग्रामस्थ यांनी आनंदी बाजाराचा आनंद घेतल्यामुळे
या आनंदी बाजाराची आर्थिक उलाढाल जवळजवळ 45 हजार रुपये झालेली आहे असे समजते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी सेवक यांचे सहकार्य लाभले.

20
3001 views