logo

BEED : अंबाजोगाई–बीड रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई–बीड रोडवरील लोखंडी सावरगावच्या वळणावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमनाथ पोपट पवार (रा. आष्टी, जि. बीड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

26
1301 views