शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांचे निधन; कला विश्वावर शोककळा
शिल्पकलेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 101 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे.
मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेल्या राम सुतार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 200 हून अधिक भव्य आणि ऐतिहासिक शिल्पांची निर्मिती केली. स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या जागतिक कीर्तीच्या महाकाय शिल्पामुळे त्यांनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले.
त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतून इतिहास, राष्ट्रभक्ती आणि कलात्मक सौंदर्य यांचे अद्वितीय दर्शन घडते.
राम सुतार यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या पिढ्या सदैव त्यांचे स्मरण करतील.