logo

जळगाव जिल्ह्यातील ७८३ हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक....


जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे भवितव्य २१ जानेवारीच्या निकालानंतरच ठरणार



जळगाव : नगरपालिका निवडणुकीनंतर मनपाची रणधुमाळी सुरू आहे. तर जळगाव जिल्हा परिषदेतील जागांमध्ये टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणुकांमुळे पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या तब्बल ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही आता पुढे जाण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील इच्छुकांना धाकधूक
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ७८३ हुन अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. तर त्यापैकी ३६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला आहे. शहरी भागातील मनपा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, ग्रामीण भागातही ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, जि. प. निवडणुकांचे भवितव्य अनिश्चित असल्याने, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही रखडतीले की काय, अशी धाकधूक इच्छुकांच्या मनात आहे.

राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून जि. प. वर टांगती तलवार आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील राखीव जागांचे प्रमाण हे ५४ टक्क्यांवर पोहचल्याने, ही आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत आणावी लागणार आहे. तसेच या निवडणुकांबाबत आता २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात कामकाज होणार आहे. २१ जानेवारी रोजी होणाऱ्या कामकाजानंतरच जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची स्थिती समजू शकणार आहे.

महापालिका निवडणुकीनंतर ग्रा. पं. निवडणुका होण्याचीही शक्यता..?

१५ जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल, त्यानंतर जि. प. निवडणुकांबाबत मात्र २१ जानेवारीच्या निकालावर निर्णय होणार आहे.

जि. प. निवडणुकांना पुन्हा ब्रेक लागला, तर त्या दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात, मात्र जर जि. प. निवडणुका २१ जानेवारीच्या निकालानंतर होण्याचा मार्ग मोकळा झाला तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे भवितव्य अंधातरीत राहू शकते

5
395 views