logo

नागपूर ची महिला सर्प मित्र चैताली भस्मे यांनी विषारी नागा पासून नागरिकांचे प्राण वाचवले

*महिला सर्पमित्र चैताली ने वाचवले विषारी नागापासून नागरिकांचे प्राण*
रात्री चे ९:३० वाजता प्रभुनगर नागपूर च्या साई एम्ब्रासी अपार्टमेंट च्या पार्किंग एरियामधे ६ फूट लांब असलेला साप बाहेरून पार्किंग मध्ये येताना वैभव व्यवहारे या तिथेच अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीस पडला .इतका मोठा साप पाहून ते घाबरून गेले साप जेव्हा फणा काढू लागला तेव्हा त्यांना समजले की हा विषारी नाग आहे .त्यांनी आसपास च्या नागरिकांकडून नंबर घेऊन लगेच सर्पमित्र चैताली ला संपर्क केला .फोन करताच सापाचे नाव ऐकून संकटाची चाहूल लागल्याने चैताली ने जेवणाच्या तटावरून उठून प्रभुनगर ला धाव घेतली आणि अंधारातच विषारी सापाला सुरक्षित पकडून लहानमुलांसोबत आणि नागरिकांसोबत घडणाऱ्या दुर्घटने पासून. वाचविले त्या सोबतच नागरिकांना रात्रीच्या वेळी आपल्या अपार्टमेंट च्या पार्किंग एरियामध्ये पुरेसा उजेड असेल अशी व्यवस्था करायला सांगितले. नाग हा भारतातील चार विषारी सापांपैकी एक असून यात न्यूरोटोक्सिक वेनम असते या सापाचा दंश झाल्यावर जर वेळीच उपचार केले नाही तर माणसाचा मृत्यू निश्चित आहे असे सर्पमित्र. चैताली ने नागरिकांना माहिती देताना सांगितले आणि सतर्क राहायला सांगितले . सापाला दूर निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले

40
1835 views