logo

नांदुरा मार्गावर दुचाकी अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू, पादचारी गंभीर जखमी..

मोताळा: दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. १०) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास नांदुरा मार्गावरील कृ.उ.बा.समिती नजीक घडली.
अनुप कैलास खर्चे (३०, रा.मोताळा) असे मृत युवकाचे नाव आहे.
मोताळा येथील प्रभाग क्रमांक दोन मधील कैलास खर्चे यांची नांदुरा मार्गावर शेती आहे. त्यांचा मुलगा अनुप खर्चे (वय ३०) हा बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीने शेतातून येत असताना, कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक त्याच्या दुचाकीची समाधान घडेकर या पादचाऱ्यास धडक बसली.

या अपघातात अनुप खर्चे या युवकाचा मृत्यू झाला. समाधान घडेकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलडाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.
अनुप हा मोताळा नगरपंचायतीच्या नगरसेविका शीला कैलास खर्चे यांचा मुलगा आहे. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. ११) मोताळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

46
1690 views