logo

भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी (दि. १२) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज (दि. १२ डिसेंबर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी विभागप्रमुख प्रा. राकेश रामटेके यांनी भैय्यासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करून सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीची धुरा सक्षमपणे सांभाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भैय्यासाहेब आंबेडकर. सामाजिक व धम्म चळवळीच्या बळकटीकरणात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.” त्यांनी आंबेडकरोत्तर काळातील चळवळीला भैय्यासाहेबांनी दिलेल्या गतीचीही माहिती दिली.

कार्यक्रमास संगीत विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सागर चक्रनारायण, समाजशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. माही फुलबांधे व मंगेश बाविसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय घोरपडे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. पौर्णिमा वाहाणे यांनी मानले.

कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी, संशोधक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2
712 views