
शिक्षण, पत्रकारिता आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम – डॉ. डिगंबर महाले
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द..
शिक्षण, पत्रकारिता आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम – डॉ. डिगंबर महाले
आदरणीय जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. डिगंबर महाले हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत, जे शिक्षक, मुख्याध्यापक आणि जेष्ठ पत्रकार या बहुगुणी भूमिकांमध्ये उत्कृष्ट आहेत. त्यांच्या शिक्षणकौशल्यामुळे विद्यार्थ्यांचे मन आकारले गेले, त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा सुव्यवस्थित विकास झाला, तर पत्रकारितेत त्यांनी आपल्या लेखन आणि संवादकौशल्याने समाजावर अमिट ठसा उमटवला.
एक जेष्ठ बंधू म्हणून, ते नेहमीच सर्वांसाठी मार्गदर्शन करणारे, मदतीस तत्पर आणि उदार व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या कर्तृत्वाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सामंजस्य, साधेपणा आणि संवेदनशीलता हे सर्वत्र आदर आणि प्रेम निर्माण करणारे आहेत.
कुशल संवादकौशल्य व सामाजिक कार्य
आपल्या कुशल संवादकौशल्याने आणि निवेदनशैलीने समाजमनावर अमिट ठसा उमटला आहे. आपले औदार्य, विचारशीलता आणि अचूक नियोजन कौशल्य हे सर्वश्रुत आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थेला आपल्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यात निराळा वैभव लाभला आहे.
पत्रकारितेत नाविन्यपूर्ण योगदान दिल्यामुळे आपण विभागीय अध्यक्षपदी निवडले गेलात, आणि त्यानंतर प्रदेश सरचिटणीस म्हणून आपले कार्य उच्च स्तरावर पुढे गेले. दैनिक भास्कर गृप तर्फे थायलंडमध्ये सिनेअभिनेता शर्मन जोशी यांच्या हस्ते मंगळ ग्रह संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही आपली आणि संचालक मंडळाची उत्कृष्ट कार्यगिरीच सिद्ध करते.
माणसाला ओळखण्याची कला
आपली माणसांना ओळखण्याची कला, हसतमुख चेहरा आणि प्रत्येकासोबत जोडलेले भावनिक नाते हे आपले व्यक्तिमत्त्व अद्वितीय बनवतात. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन निर्माण होणारा आपला दृष्टीकोण समाजात चैतन्य निर्माण करतो. मुख्याध्यापक असतांना कामावर निष्ठा अढळ राहिली आणि अमळनेर ह्या मातृभूमीबद्दल जिव्हाळा कायम ठेवला.
अमळनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मंगळ ग्रह सेवा संस्थांमध्ये आपल्याच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले आहेत. अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देऊन, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात आपले योगदान अपूर्व आहे.
मंगळ ग्रह सेवा संस्थेची सर्जनशील कार्यगिरी
मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून समाजात मोठा विकास झाला आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे, उपक्रमांना शिस्तबद्ध व्यवस्थापन प्रदान करणे आणि प्रत्येक कार्यक्रमात पूर्ण सहभाग हे आपल्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
आजही मंगळ ग्रह मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक राजकीय, सामाजिक, साहित्यिक व सेलिब्रिटी मंडळींनी येथे भेट दिलेली आहे. मंदिराचा परिसर पर्यटकांसाठी विकसित केला असून, येथे येणाऱ्यांना एक आध्यात्मिक अनुभव प्राप्त होतो.
पत्रकारितेत योगदान
सरांनी पत्रकारितेत अनेक वर्ष कार्य केले आहे. दैनिक सकाळ, लोकमत सारख्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले आणि दैनिक ग्लोबल तेज हे वृत्तपत्र सुरू करून अल्पावधीतच वाचकांचे आवडते वृत्तपत्र बनवले.
व्हाईस ऑफ मीडियामध्ये जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्य करताना अनेक सामाजिक व पत्रकारितासंबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरांनी देखील सरांच्या कार्याची वारंवार प्रशंसा केली आहे. सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन जाण्याची आपली पद्धत आणि सर्वांशी मानसन्मानाने वागणे ही सरांची खास वैशिष्ट्ये आहेत.
व्यक्तिमत्त्व आणि समाजसेवा
सरांचा मितभाषी, सहृदय आणि मदतीस नेहमी तत्पर स्वभाव प्रेरणादायी आहे. आपल्या कार्यामुळे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणे, रोजगार निर्माण करणे आणि सेवा प्रमोधर्म या तत्वावर काम करणे ही सरांची जीवनमूल्ये आहेत.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सरांना निरामय स्वास्थ्य, आनंद, यश आणि भावी जीवनातील उन्नतीची सदिच्छा व्यक्त करतो. संत गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की, आपल्या आरोग्य उत्तम राहो आणि आपण आपल्या कार्यातून समाजाला प्रेरित करत राहाल.
आपला वाढदिवस आनंद, हर्षोल्लास आणि स्नेहाने साजरा होवो ही सदिच्छा!
शिक्षक, मार्गदर्शक, ज्ञानाचा प्रकाश,
मुख्याध्यापक म्हणून दिला जीवनाला आधार खास।
पत्रकारितेत लेखनाने समाजाला दिला मार्गदर्शन,
सत्य व विचारासाठी नेहमी उंचवले तुमचे मन।
मंगळ ग्रह संस्थेत सामाजिक कार्याचा उज्वल झरा,
वाढदिवसाच्या शुभेच्छा, आनंद व आरोग्य लाभो नितरा!
आपला स्नेहाकिंत
श्री ईश्वर आर. महाजन
पत्रकार – अमळनेर
📞 9860352960