logo

नाशिकमध्ये जय बजरंग सेवा मित्र मंडळातर्फे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी ४ डिसेंबर (नाशिक) :- नाशिक मधील दत्तनगर परिसरातील मारुती संकुल या ठिकाणी आज जय बजरंग सेवा मित्र मंडळातर्फे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंतीच्या उत्सवासाठी जय बजरंग सेवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे नवीन नाशिकचे उपाध्यक्ष रामदास दातीर, संतोष हनवते, राजेंद्र दातीर, संतोष मळगे, सोनू रावळे, हेमंत उडानशीव, शांताराम दातीर, योगेश गवळी, विकी गुळवे, सुभाष कर्डिले आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अगदी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिरा, वरण, भात, भाजी, कडी अशा पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांचे नियोजन करण्यासाठी जय बजरंग सेवा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला होता. दोन ते तीन हजार दत्त भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

दत्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मोठा मंडप देऊन रांगोळी काढून फुलांनी सजावट करण्यात आली होती. या दत्त जयंतीसाठी दत्तनगर मधील अनेक पुरुषांनी आणि महिलांनी सहभाग दाखवला होता. सर्व भाविक दत्त महाराजांच्या चरणी लीन होत होते. यावेळी दत्त महाराजांची गीते, आरती, भजन, सत्यनारायण, महाअभिषेक अशी अनेक कार्यक्रम पार पडले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी परिसर दुमदुमून निघाला होता. एकूणच अशा पद्धतीने नियोजन केल्यामुळे आणि भक्तांच्या भक्तीमुळे परिसरातील वातावरण आनंदी झाले होते.

0
471 views