logo

संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा

संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा

दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ला संविधान दिवसाच्या निमित्ताने डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ़ एज्युकेशन,साकोली येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व संविधानाच्या प्रतीला विनम्र अभिवादन करून करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा. अक्षय पुस्तोडे सर, प्रा.प्राची झिंगरे मॅडम, प्रा.मृणाली बावनकर मॅडम प्रा. चेतन कापगते सर प्रा.शैली मॅडम व इतर प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून प्रा. अक्षय पुस्तोडे यांनी संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व यावर सविस्तर माहिती देऊन संविधानिक कर्तव्य व मूल्यांचे जतन करणे हे काळाची गरज आहे असे सांगितले.तर प्रमुख मार्गदर्शक यांनी सुद्धा संविधान व संविधानाची गरज का याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम त्यामध्ये रांगोळी स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली . बी.एड प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी क्षितिज खोब्रागडे व सोनिया टेंभुर्णी या विद्यार्थ्यांनी संविधान पर कविता सादर करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.लांजेवार ,प्रा. तुराणकर प्रा. खेडकर प्रा. ओगले तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचिन खोब्रागडे, योगेश सोनवणे, प्रेमदास रामटेके व बी.एड प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कु. प्राची खेडकर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. सपना बावनकर हिने केले.

60
3071 views