हॉटेल खरेदी व्यवहारातून व्यावसायिकाला मारहाण....
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखलजळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास व्यावसायिक खूबचंद साहित्य यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल के.पी. प्राईडच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.बुधवारी सायंकाळी सहा वाजता खुबचंद साहित्य यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या जबाबानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवेंद्र छोटू पवार, निखिल यांच्यासह अन्य दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.