logo

भव्य आरोग्य शिबिरातून ५०० नागरिकांची तपासणी – १०० तरुणांनी केले रक्तदान

प्रतिनिधी जुबेर शाह

बुलढाणा: हिवरा आश्रम, ता. मेहकर – दिनांक २६/११/२०२५ बुधवार रोजी हिवरा आश्रम ग्रामीण रुग्णालयात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि आयुष स्वतंत्र प्रभार माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर, औषध वितरण, रक्तदान शिबिर तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरणाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ५०० रुग्णांनी विविध तपासण्या करून घेतल्या. नेत्र तपासणी, रक्त तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी यासोबतच १०० रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. तर १०० उत्साही तरुणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी निभावली.

कार्यक्रमाला माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब, तसेच मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी क्षयरोगावरील जनजागृतीवर भर दिला व ७ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे मॅडम यांनी भूषविले.
तसेच मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. हीसे मॅडम, डॉ. दिनकर खिरोडकर, विवेकानंद आश्रमचे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोराते, सरपंच पती मनोहर गिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास मोहरूत, माजी सरपंच पुंजाजी इंगळे, दामू अण्णा गारोळे, अशोकराव लहाने, माजी पंचायत समिती उपसभापती बबनराव लहाने, सुमित भाकडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगळे, समाधान बनसोडे, योगेश देशमुख, अमोल मस्के, सचिन मोरे, बंडू मोरे, गणेश इंगळे, रोहन सरकते, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित धांडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धेश्वर सोलंकी, शिवसेना नेते गणेश बोचरे, केशव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार संजयजी रायमुलकर यांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले व आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी हजारो महिला, पुरुष व तरुण उपस्थित राहिले.

या भव्य शिबिराचे आयोजन युवा नेते नितीन इंगळे, विठ्ठल भाकडे पाटील, सुमित भाकडे युवा सेना, शिवसेना, तसेच कलबेश्वर जिल्हा परिषद सर्कल व हिवरा आश्रम पंचायत समिती सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

0
660 views