पिस्तूलची माहिती घेण्यासाठी पोलिस उमर्टीत.....
जळगाव : वर्चस्वाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात वापरलेले पिस्तूल कोठून आणले याची माहिती काढण्यासाठी या प्रकरणात अटक केलेल्या तिघांपैकी करण पाटील (वय २५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला पोलिसांतर्फे उमर्टी (मध्यप्रदेश) येथे नेण्यात आले. मात्र, पिस्तूल विकणाऱ्याने त्याचे नाव बनावट सांगितल्याने तो सापडला नाही.कांचननगरमध्ये ९ नोव्हेंबर रोजी गोळीबार होऊन आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विक्की अरुण चौधरी, आकाश सपकाळे व करण पाटील यांना अटक करण्यात आले होते. चौकशीदरम्यान पिस्तूल मध्य प्रदेशातील उमर्टी येथून आणल्याची कबुली करण पाटील याने देत कोणाकडूनआणले त्याचे नावही सांगितले होते.पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर या करणला घेवून मध्य प्रदेशातील उमर्टी या गावात गेल्या. बोगस कॉन ज्याच्याकडून पिस्तूल खरेदी करण्यात आले होते, त्याचाही शोध घेण्यात आला. मात्र, विकणाऱ्याने खोटे नाव सांगितले असल्याने तो सापडला नाही, अशी माहिती मिळाली.