logo

नबीरा महाविद्यालयाची कु. स्नेहा ए. गेडाम हिची एम.ए. (इतिहास) च्या उन्हाळी परीक्षा २०२५ च्या गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) यशोगाथा

📰
🎓 Aima News Egency
काटोल: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) वतीने घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ आर्ट्स (इतिहास) उन्हाळी परीक्षा २०२५ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात, येथील नबीरा महाविद्यालयाची (Department of History) विद्यार्थिनी कु. स्नेहा ए. गेडाम हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
स्नेहाने द्वितीय गुणवत्ता यादीत (Second Merit List) स्थान मिळवून महाविद्यालयाचा आणि काटोल तालुक्याचा गौरव वाढवला आहे. तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे आणि तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्नेहाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे आणि प्रेरणाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0
58 views