स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सर्वेक्षणात नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाची केली पाहणी
नांदेड ः स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी आज नांदेड येथे राज्यस्तरीय समितीने आज (दि.२५) रोजी सकाळी ११ वाजता बसस्थानकाची पाहणी केली. यात प्रादेशिक व्यवस्थापक सौ.चेतना खीरवाडकर व प्रादेशिक अभियंता विवेक लोंढे, त्यांच्यासोबत विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर तसेच माध्यम प्रतिनिधी म्हणून रमाकांत घोणसीकर, विभाग नियंत्रण डॉ. चंद्रकांत वडस्कर, वाहतूक अधीक्षक तथा आगार प्रभारी मिलिंद सोनाळे, बसस्थानक प्रमुख यासीन खान, महामंडळाचे कर्मचारी बालाजी शिंदे, रब्बानी, फुलारी यांची उपस्थिती होती.
या समितीचे विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर समितीने बस स्थानकातील आगारासह संपूर्ण परिसराची स्वच्छता पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, चालक, वाहक व प्रवाश्यांसाठी दिल्या जाणा-या सुविधा आदीची तपासणी केली. या तृतीय सर्वेक्षणानंतर बसस्थानक तपासणीचा अहवाल ते शासनाला सादर करणार आहेत, अशी माहिती मिळाली.