logo

शहर विकासाची नवी दिशा: प्रभाग 9 ‘ब’ मध्ये चेतन देवसिंग राजपूत यांना नागरिकांचा जबरदस्त पाठिंबा”

“शहर विकासाची नवी दिशा: प्रभाग 9 ‘ब’ मध्ये चेतन देवसिंग राजपूत यांना नागरिकांचा जबरदस्त पाठिंबा”

अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघातून चेतन देवसिंग राजपूत यांना शहर विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताच परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पदावर नसतानाही गेले काही वर्षे सातत्याने प्रभागातील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी केलेल्या कामांचा ठसा नागरिकांच्या मनावर उमटला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभागातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे.
चेतन राजपूत यांनी नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद देत माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने प्रभागातील रस्ते, उद्याने, धार्मिक स्थळे, शैक्षणिक परिसर आणि वाहतूक मार्गांचे सुशोभीकरण यावर विशेष भर दिला. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करून परिसरात आकर्षक हिरवेगार नंदनवन उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून उद्यानात बालकांसाठी खेळणी, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक या सुविधा उपलब्ध करून दिल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळाले.खासदार स्मिताताई वाघ यांनीही विकासासाठी त्यांना अनमोल सहकार्य केले.श्री शनि गल्लीत आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात पुढाकार घेऊन तसेच जैन जागृती सेंटरच्या अनमोल सहकार्याने भगवान शितलनाथ चौकाचे नामकरण व स्मारक निर्मिती पूर्ण करून धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढवले.
प्रभागातील प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण, मजबुतीकरण आणि दुरुस्ती या कामांवर स्वतः लक्ष ठेवत सतत पाठपुरावा केला. आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंगलमूर्ती पतपेढी ते पोस्ट ऑफिस चौक रस्ता, स्टेट बँक ते सेवा मेडिकल रस्ता , रुग्णसेवा हॉस्पिटल ते बस स्टँड मार्ग, बोहरी पेट्रोल पंप ते मच्छी बाजार रस्ता, विजय फरसाण ते गीता प्रोव्हिजन मार्ग, सुभाष चौक ते बालेमिया चौक रस्ता, रुग्णसेवा हॉस्पिटल ते जुनी सेंट्रल बँक मार्ग, अजय ट्रॅव्हल्स ते वर्धमान झेरॉक्स मार्ग, डी.आर. कन्या शाळा ते कचेरी रोड मार्ग, भगिनी मंडळ शाळा ते डी.आर. कन्या शाळा मार्ग, बोहरी चौक ते आयडीबीआय बँक रस्ता ह्या रस्त्यांची कामे होण्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका चेतन राजपूत यांनी बजावली आहे.
या सर्व कामांमुळे प्रभागातील वाहतूक सुकर झाली असून नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि प्रशस्त रस्त्यांचा लाभ मिळत आहे.

नागरिकांचा वाढता विश्वास...

चेतन देवसिंग राजपूत यांनी पद नसतानाही केलेल्या कामांच्या जोरावर प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर दृढ विश्वास दाखविला आहे. त्यांची ओळख प्रेमळ कर्तबगार आणि विकासाभिमुख युवा नेतृत्व अशी निर्माण झाली आहे. प्रभाग 9 ‘ब’ मतदारसंघात विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी नागरिकांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच त्यांची खरी ताकद असल्याचे म्हटले जात आहे.

4
67 views