logo

पैसा देऊन पद मिळवा’ संस्कृतीला ठाम विरोध — सजग मतदारांची गरज! पदांचा बाजार, खोट्या पात्रतेमुळे बिघडलेली व्यवस्था आणि भ्रष्ट राजकारणावर अचूक प्रहार

‘पैसा देऊन पद मिळवा’ संस्कृतीला ठाम विरोध — सजग मतदारांची गरज!

बोगस पदांचा बाजार, खोट्या पात्रतेमुळे बिघडलेली व्यवस्था आणि भ्रष्ट राजकारणावर अचूक प्रहार!

सुनिल दयाराम महाजन
प्रभाग 13 ब मधील उमेदवार


अमळनेर प्रतिनिधी :
आजच्या काळात राजकारणात ‘पैसा कमवा आणि पद मिळवा’ ही धोकादायक प्रवृत्ती अधिक बळावली असून, बोगस पदे, खोट्या पात्रता, बनावट डिग्री आणि कृत्रिम प्रभाव यांच्या जोरावर सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतही पैशाने ‘डिग्री’ घेणाऱ्यांमुळे रुग्णांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवितास सरळ सरळ धोका निर्माण होत आहे. याच खोट्या पात्रतेमुळे रस्ते निकृष्ट बनतात, सहा महिन्यात पूल तुटतात, कागदोपत्री विकासकामे पूर्ण दाखवली जातात—हीच भ्रष्ट व्यवस्थेची वास्तव कहाणी.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. आपल्या वार्डातील समस्या लक्षात घेऊन उमेदवारांना मुद्देसूद प्रश्न विचारणे—हा केवळ हक्क नाही तर विकासासाठी अपरिहार्य टप्पा आहे. रस्ते, गटारव्यवस्था, २४ तास पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, आकस्मिक परिस्थितीत उमेदवारांची तत्परता—ही सर्व बाबी तपासल्याशिवाय मतदान करू नये. कारण तुमचे एक मत पुढील पाच वर्षांचे भविष्य बदलू शकते.

मतदारांनी विशेष लक्ष द्यावे की बोगस डिग्रीधारक, पैशाने उमेदवारी घेणारे, दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित, समाजसेवेशी संबंध नसलेले आणि अचानक चमकून राजकारणात उतरलेले उमेदवार जनतेसाठी अपायकारकच ठरतात. त्याऐवजी प्रामाणिक, विश्वासू, लोकांशी जोडलेले, ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ मानणारे, शांतचित्ताने लोकांची कामे करणारे आणि विकासाभिमुख उमेदवारांनाच संधी दिली पाहिजे. काही उमेदवार नवखे असले तरी त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांना वेगळं स्थान देते; तर काही जण फक्त पदासाठीच चमकून येतात—यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे.

मतदारांचे लाखमोलाचे एक मत इतिहास घडवू शकते. पैशाच्या प्रलोभनांना, बोगस आश्वासनांना आणि खोट्या पदांना बळी पडू नका. अधिकार जपा, इमान जपा आणि योग्य उमेदवार निवडा.

याच ध्येयाने अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये
वॉर्ड क्रमांक 13-ब सर्वसाधारण पुरुष मतदारसंघातून अधिकृत अपक्ष उमेदवार म्हणून

👉 सुनिल दयाराम महाजन

(स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, समाजपरिवर्तनवादी, सामाजिक सुधारक, तरुणांमध्ये नवा विश्वास व उमेद निर्माण करणारे समाजसेवक)
जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक लढत देत आहेत.

योग्य उमेदवार निवडा — विकास निवडा — भविष्य सुरक्षित करा!
🙏🏻🙏🏻🙏🏻

1
174 views