logo

महाराष्ट्र राज्य पेंशनर अहिल्यानगरअसोसिएशन की सर्वसाधारण सभा संपन्न .

दिनांक 18 /11 /2025 रोजी अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनची सर्वसाधारण बैठक प्राथमिक शिक्षक बँक एक्य मंदिर गांधी मैदान येथे संपन्न झाली . या बैठकीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली . अंशराशीकरण, उपदान संगणक कपात, प्राविडंट फंड, इत्यादी पेंशनरच्या अनेक दीर्घकालीन पडून असलेल्या समस्या कडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहे का ?ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून आयुष्य समाज व राष्ट्रासाठी वेचले त्यांना त्यांचा ही लाभ तात्काळ न देता, दोन-तीन वर्षानंतर उशिरा दिला जातो, यावर चर्चा करून उपाययोजना करण्याची ठरले .
जिल्हा संघटना अध्यक्ष द. मा . ठुबे सरचिटणीस ब .द .उबाळे, कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, दक्षिण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर थोरात, जेष्ठ मार्गदर्शक,श्री .ज्ञानदेव लंके आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी सदर सभेस उपस्थित होते . यावेळेस अध्यक्ष द . मा . ठुबे यांनी आपल्या मागण्या व लाभासाठी जिल्हा परिषद वर प्रचंड असा मोर्चा न्यावा लागेल.प्रशासन आपला जाणीवपूर्वक विचार करत नाही . म्हणून सर्वांनी मोर्चाची तयारी करावी .बहुसंख्य सेवानिवृत्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले . बद उबाळे यांनी सेवानिवृत्तांना मुद्दामच कार्यालयीन लेखा विभागाकडून त्रास दिला जातो की काय असा प्रश्न उपस्थित केला ? व सर्वांनी संघटित होऊन आपली ताकद दाखवण्याचे आवाहन केले . दक्षिण विभाग प्रमुख ज्ञानदेव थोरात यांनी शासनाच्या या दीर्घसूत्रीपणाबद्दल नाराजी व्यक्त करून पेन्शनर लोकांनाच का त्रास दिला जातो ? याबाबत आपले विचार व्यक्त केले .त्याचप्रमाणे दिनांक 19 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार माननीय निलेशजी लंके यांनी 250 पेन्शनर लोकांची सहल दिल्ली पर्यटनासाठी नेली होती. त्यावेळी त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व जवळून वृद्ध सेवानिवृत्तांची काळजी घेतली . सर्वांची व्यक्तिगत विचारपूस केली .औषधोपचार जेवण दिल्लीमधील निवास भोजन व्यवस्था. प्रवास खर्च याचा कोणताही भार त्यांनी सेवानिवृत्तांना पडू दिला नाही . त्या काळातील जे क्षणचित्र टिपले होते . त्या प्रसंगाच्या अल्बम तयार करण्यात आला . त्या अल्बम चे प्रकाशन आज माननीय सुविद्य, सुजान राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटचे खाजदार निलेश लंके यांचे वडील शांत सुस्वभावी श्री . ज्ञानदेव लंके,अध्यक्ष,सरचिटणीस उपाध्यक्ष, आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशनचे आगामी अधिवेशन 20 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र नरसी नामदेव जिल्हा हिंगोली या ठिकाणी होणार आहे . त्या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्याची आवाहन अध्यक्ष श्री ठुबे , सरचिटणीस ब .द .उबाळे जे . मार्गदर्शक ज्ञानदेव लंके,आणि श्री ज्ञानदेव थोरात यांनी आवाहन केले . महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशनची अधिवेशनाची तयारी जोरदार चालू असून आपण सुद्धा यामध्ये मागे पडता कामा नये. आपल्या जिल्ह्यातील बरेचसे लोक संघटनेच्या कार्याकडे दुर्लक्ष करतात परंतु संघशक्ती शिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही . हे सर्वांनी लक्षात ठेवावे .असे आवाहन दक्षिण विभाग प्रमुख श्री ज्ञानदेव थोरात यांनी केले .
तसेच महाराष्ट्र राज्य पेन्शनर असोसिएशन मार्फत दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो . ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक, शैक्षणिक राजकीय,तसेच संघटनेच्या कामासाठी योगदान दिलेले आहे . विशेष बहुआयामी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केले आहे . अशांना हा जीवनगौरव राज्य संघटनेमार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिभावंतांना प्रदान केला जातो . 2026 चा हा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील आईमा मीडिया ऍक्टिव्हेट,साहित्यीक डॉक्टर श्री .संजय सिताराम गीते . जामखेड तालुका अध्यक्ष तसेच श्री .पोपट इथापे पारनेर तालुका अध्यक्ष यांना प्रदान केला आहे . जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री कोल्हे व श्री गांगर्डे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले व सभा संपन्न करण्यात आले .

27
5468 views