logo

नशा मुक्त भारत अभियानांतर्गत छात्राध्यापकांनी घेतली शपथ

नशा मुक्त भारत अभियानांतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन साकोली नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ ग्रहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. अक्षय पुस्तोडे यांनी विद्यार्थ्यांना नशेमुळे होणारे आरोग्य, सामाजिक व शैक्षणिक दुष्परिणाम यांची माहिती देत जागरूकतेची गरज स्पष्ट केली. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी एकत्रितपणे भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "नशा मुक्त भारत" ही शपथ घेतली.या शपथेमध्ये नशा करणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणे, अन्य व्यक्तींनाही नशेपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे, समाजात आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. प्राची झिंगरे, प्रा. शैला धनजोडे, प्रा. मृणालिनी बावनकर, प्रा. चेतन कापगते, सचिन खोब्रागडे, योगेश सोनवाणे, यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. तसेच बी.एड.चे छात्राध्यापकानी मोठ्या संख्येत उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले.

0
600 views