logo

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ; अडचणीत सापडलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा; महिला व बालविकास विभागाचा निर्णय

महाराष्ट्रातील "मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
याआधी ई-केवायसी पूर्ण करण्याची 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती; मात्र अनेक लाभार्थींना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता न आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती दिली. राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या पूरस्थिती, तांत्रिक अडचणी आणि दस्तऐवजांच्या पडताळणीतील विलंब यामुळे अनेक महिलांना ई-केवायसी करता आले नव्हते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, कुणीही योजनाबाहेर राहू नये यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरातील लाभार्थी महिलांनी आता नव्या अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून योजना लाभ सातत्याने मिळवावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

5
779 views