logo

पिंप्राळ्याच्या मंडळाधिकाऱ्यासह मोहाडीचा तलाठी निलंबित धानोरा अवैध वाळू उपसा मुख्यालय बदलले


जळगाव : तालुक्यातील धानोरासह खेडीखुर्द परिसरातील गिरणा नदी पात्रातून सुमारे २ हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी पिंप्राळ्याचे मंडळाधिकारी व मोहाडीच्या महिला तलाठ्यांवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

मंडळाधिकारी मारोडे यांना निलंबन काळात चाळीसगाव तर तलाठी तायडे यांना भुसावळ मुख्यालय देण्यात आले आहे. संबंधित तहसीलदारांच्या परवानगीशिवाय दोघांना मुख्यालय सोडण्यास निर्बंध घातले आहेत.

मंडळाधिकारी हेमंत विश्वनाथ मारोडे व तलाठी कविता संपत तायडे असे निलंबित झालेल्या या दोघांची नावे आहेत.

44
1463 views