logo

अनुदान वाटपात गैरव्यवहार, दोन तलाठ्यांसह चार निलंबित

जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यातील गैरव्यवहारप्रकरणी दोन तलाठी, प्रत्येकी एक कोतवालासह महसुल सहायकाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निलंबित केले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसे पुरावेही त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी एका समितीकरवी चौकशी केली. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी चौघांना निलंबित केले आहे.

यांना केले निलंबित

मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठी महेंद्र वंजारी, उचंद्याचे कृष्णकुमार ठाकूर (हल्ली पारोळा येथे सेवारत), तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक मोनीष बेंडाळे व उंचद्याचे कोतवाल राहुल सोनवणे यांचा समावेश आहे.

1
987 views