अनुदान अपहारप्रकरणी उचंदा येथील एक ताब्यात
मुक्ताईनगर तहसीलदारांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखलमुक्ताईनगर : शासनाकडून देण्यात आलेल्या शेतकरीअनुदानात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या आरोपानंतर याप्रकरणी तहसीलदारांनी शनिवारी फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उचंदा (ता. मुक्ताईनगर) येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तथ्य आढळून येत असल्याचा दुजोरा दिला होता. याप्रकरणी शनिवारी तहसीलदारांनी फिर्याद दिल्यानंतर या अनुदान घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निदश अमरिकेच्या गृहखात्याने आपले दूतावास व कौन्सुलर अधिकाऱ्यांना दिले आहेत.आजारग्रस्त परदेशी नागरिकांच्या उपचाराचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडू नये व अन्य संसाधनांवर त्याचा भार पडू नये, म्हणून हे निर्देश आहेत.सातबारावर नाही नाव तरी नुकसानभरपाईचे अनुदानमुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा आणि बोरखेडा येथील काही शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत. तरीही त्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान वर्ग करून अपहार करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.