
भंडारा येथे तालुकास्तरीय वंदे मातरम कार्यक्रम समिती गठीत
विलास केजरकर भंडारा.
प्रेस नोट
भंडारा
भंडारा येथे तालुकास्तरीय वंदे मातरम कार्यक्रम समिती गठीत
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्रालय मुंबई व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी " शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथे वंदे मातरम " या गितास १५० वर्षे पुर्ण होत आहेत या औचित्याने कार्यक्रम साजरा होत आहे या उपक्रमासाठी विशेष समितिचे स्थापना करण्यात आली असून तालुका स्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करुन विद्यार्थींमध्ये देश भक्तीची भावना उंदीगत करण्याचा हेतू या मागे आहे."
वंदे मातरम" गिताच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमीत ऐतिहासिक व सांस्कृतीक दृष्टीने महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने तालुकास्तरीय वंदे मातरम कार्यक्रम समिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा (टाकळी परिसर) येथे नुकतीच गठीत करण्यात आली.
त्यात अध्यक्ष पदी तहसीलदार श्री. संदीप माकोडे, सचिव म्हणून भंडारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ. एन. डी. पीसे, गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास अधिकारी सुधाकर झलके, गट शिक्षणाधिकारी शंकरराव राठोड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे डॉ. अनिल कुर्वे, भंडारा पोलीस स्टेशनचे निरिक्षक उल्हास भुसारी, शिक्षण संस्था प्रतिनिधी सुनिल खिलोटे, संत महाराज ओमदेव चौधरी, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कु. प्राची चटप, साहीत्यिक प्रमोद कुमार अणेराव, पत्रकार चेतन भैरम, गडकिल्ले संवर्धन समितीचे जिल्हा समन्वयक मोहमद सय्यद शेख, निखील कुंभलकर, नरेंद्र गि-हेपुंजे, उद्योजक समिर पटेल, महिला बचत गट प्रमुख सौ. सुनंदा कुंभलकर, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी डॉ. यशवंत लांजेवार, विलास केजरकर, यशवंत बिरे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर राष्ट्रीय संपर्कप्रमुख विश्व मांगल्य सभा अध्यक्षा शुभांगीताई सुनील मेंढे यांचे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभणार आहे .
त्यानिमित्ताने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी " वंदे मातरम " या गितास १५० वर्षे पुर्ण होत आहेत. सदर "वंदे मातरम" गिताच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमीत ऐतिहासिक व सांस्कृतीक दृष्टीने महत्वाच्या घटनेच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये " वंदे मातरम " गितगायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतीक कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तरी कार्यक्रमाला तालुक्यातील शासकीय, अशासकीय शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन समिती सचिव तथा भंडारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ. एन. डी. पीसे व तालुकास्तरीय वंदे मातरम कार्यक्रम समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015