logo

चक्क मृत व्यक्तीच्या नावे काढले ८ लाखांचे कर्ज



फायनान्स कंपनी कर्मचारी, एजंटसह तिघांवर गुन्हा



जळगाव : महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पदाचा दुरुपयोग करत, एजंटच्या मदतीने एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचे संस्थेची केल्याची कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक खळबळजनक घटना १ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचारी, एजंटसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्कर उमाकांत वारके (वय ३३, रा. श्रीनगर, भुसावळ) हे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लि. मध्ये एरिया बिझनेस मॅनेजर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, याच संस्थेत काम करणारा अमोल रमेश भावसार (रा. बाबुराव नगर, जळगाव) याने त्याचा पदाचा दुरुपयोग केला. भावसार याने मनीष राजेश रायचंदे (रा. शिरसोली प्र.न., जळगाव) आणि धनंजय पांडुरंग चौधरी (वय ३४, रा. निवृत्तीनगर, जळगाव) यांच्यासोबत संगनमत केले.

आरोपींनी मयत भिका ओमकार 3 पाटील यांचे निधन झालेले असतानाही, त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यावर खोट्या सह्या केल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ८ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर करून घेतले.

7
864 views