logo

नूतन कन्या शाळेत दिवाळीनिमित्त दीपोत्सव व आनंद मेळावा उत्साहात साजरा विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
नूतन कन्या शाळा,भंडारा

नूतन कन्या शाळेत दिवाळीनिमित्त दीपोत्सव व आनंद मेळावा उत्साहात साजरा
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असणारा तेजोमय प्रकाशोत्सव साजरा करतांना शाळेची परंपरा जपत नूतन कन्या शाळा भंडारा येथे दिपावलीच्या पूर्वसंध्येला गृहविज्ञान विभागातर्फे आनंद मेळावा व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. एम. एल. भुरे, सचिव शेखर बोरसे, कार्यकारिणी सदस्य रेखा पनके, सीमा चित्रिव, शाळेच्या प्राचार्य निलु तिडके मंचावर उपस्थित होते.
शाळेच्या विदयार्थिनींनी महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करुन मान्यवरांचे फुलांच्या माळांनी तसेच लक्ष्मीची पावले, स्वस्तिक यांनी सजविलेल्या प्रवेशद्वारावर औक्षण व पुष्प पाकळ्यांची उधळण करून स्वागत केले. दिवाळीच्या पावन पर्वावर नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर पूजन व उद्घाटन करण्यात आले. विदयार्थिनी गीत माटुरकर हिने लक्ष्मी मातेची भूमिका साकारली. दिवाळीच्या पर्वावर तयार केलेल्या नवप्रवेशद्वारावर तयार केलेल्या कमळपुष्पावर या मांगल्यदेवतेच्या लक्ष्मीस्वरुपी बालिकेचे पूजन करण्यात आले. उद्योग मार्गदर्शन केंद्रांतर्गत यावर्षी बीएड च्या प्रशिक्षणार्थींनी स्वयंसिद्धा हे स्टॉल लावून आनंदमेळाव्यात सहभाग नोंदविला.
आनंद मेळाव्याचे उदघाटन अध्यक्ष एम. एल. भुरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गृह विज्ञान विभागात स्वतः तयार केलेले दिवे विक्रीस ठेवून विदयार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या व्यावसायिकता व उद्योजकता शिकविणाऱ्या ह्या विविधांगी उपक्रमात भरगच्च साहित्याने परिपूर्ण स्टाॅल्स म्हणजे आनंद मेळाव्याचे आकर्षण होते. संस्थाध्यक्ष भुरे यांच्या नवसंकल्पनेला साकार रूप देण्याकरिता मुख्याध्यापक निलु तिडके यांच्या मार्गदर्शनात उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन गृहविभाग विभागाने केले.
दीपोत्सवाच्या निमित्ताने शाळेत दिव्यांची आरास व आकाश कंदीलांची सजावट करण्यात आली. खरी कमाई अंतर्गत स्काऊट गाईड च्या विदयार्थिनींनी खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. विदयार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा व सोबतच व्यावसायिक शिक्षणाचा व व्यावहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून दरवर्षी शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी विदयार्थिनींनी खाद्य पदार्थ, विविध जीवनोपयोगी वस्तूंचे तसेच रंगीत दिवे, दागिने, पूजन साहित्य, अगरबत्ती, मेहंदीचे स्टॉल्स लावून उदयमता जपली. सर्व अतिथींनी विदयार्थिनींचे कौतुक करून स्टाॅलवरील साहित्यांची खरेदी केली व खाद्य पदार्थांचाआस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी पा.वा. नवीन मुलींच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापक करूणा इन्कने, वीणा कुर्वे, मुख्याध्यापक सुनिता पटोले (हुकरे) तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षक श्रद्धा रामेकर व प्रिया ब्राह्मणकर, अरुणोदय बालक मंदिरच्या मुख्याध्यापक मीरा धास्कट उपस्थित होते. उत्कृष्ट कौशल्य विकासासाठी व पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी विदयार्थिनींना शुभेच्छा दिल्यात व कौतुक केले.
आनंदमेळाव्याचा सर्व मान्यवर, शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच शाळेतील विदयार्थिनींनी आस्वाद घेतला. प्राचार्य निलु तिडके यांच्या नियोजनातून मूर्त रूपास आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गृहविज्ञान विभाग प्रमुख रश्मी मोहरकर व सहाय्यक शिक्षिका कविता चरडे तसेच सहकारी शिक्षिका व विदयार्थिनी यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन क. म. विदयार्थिनी मिताली रावते व डॉली माली यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका कविता चरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.


RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
160 views