logo

पदवीधर विधानपरिषद निवडणूक

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊ ः खा. रवींद्र चव्हाण

नांदेड, दि. २६ - आगामी मराठवाडा पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक पुर्ण ताकदीने लढाईची आहे. यासाठी अधिकाधिक मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे. मतदार नोंदणी म्हणजे पदवीधर निवडणूक जिंकण्याचा मार्ग आहे शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांपर्यत जाण्याची संधी देखील आहे असे प्रतिपादन माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पदवीधर निवडणूक मराठवाडा समन्वयक अनिस अहेमद यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन घ्यावी जेणेकरून महाविकास आघाडीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला मागता येईल अशा स्पष्ट सुचना खा. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केल्या

आगामी पदवीधर विधानपरिषद निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री तथा पदवीधर निवडणूक मराठवाडा समन्वय अनिस अहेमद व खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शनिवार (ता.२५) रोजी पक्ष कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ. यशपाल भिंगे व अल्पसंख्याक विभागाच्या मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल अब्दुल हफिज अब्दुल रहमान यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पदवीधर निवडणूक मराठवाडा सहसमन्वयक महेश देशमुख तरोडेकर हे काँग्रेस कडून पदवीधर निवडणूकीसाठी इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीसह विजयासाठी अधिकाधिक मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवहान मान्यवरांनी केले. यावेळी माजी मंत्री अनिस अहेमद, खा. रवींद्र चव्हाण, दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, डॉ. यशपाल भिंगे, अब्दुल हफिज अब्दुल रहमान, मराठवाडा सहसमन्वयक महेश देशमुख तरोडेकर, डॉ. श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडसकर, डॉ. रेखा चव्हाण, सुरेश गायकवाड, डॉ. दिनेश निखाते, शमिम अब्दुला, मसुद खान, अनिल मोरे, बालाजी गाडे, आनंद चव्हाण, आनंदा गुंडिले, गंगाधर सोंडारे, अब्दुल गफार, बालाजी चव्हाण, विठ्ठल पावडे, सुरेश हटकर, विलास पावडे, सत्यपाल सावंत, रहिम खान, अजिज कुरेशी, गोविंद बाबा गोंड, बालाजी चव्हाण, मुन्ना अब्बास, बापूसाहेब पाटील, रंगनाथ भुजबळ, निरंजन पावडे, किशोर देशमुख रुईकर, प्रताप देशमुख बारडकर, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, ललिता कुंभार, आशा कदम, महेश मगर, गगन यादव, दिपकसिंग हुजूरिया, संजय वाघमारे, अंबादास रातोळे, अनिल पाटील चिमेगावकर, शेख मुख्तार, आदीसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------चौकट ----

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आजून कोणती योग्य वेळ हवी - अनिस अहेमद

पक्षवाढीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात येतात पण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना करु शकत नाहीत. कर्जमाफी योग्य वेळी देऊ ते म्हणत आहेत पण शेतकऱ्यांचे येवढे मोठे प्रचंड नुकसान झाल्यावर देखील योग्य वेळ म्हणणाऱ्यांनी ती योग्य वेळ कोणती एकदा जाहीर करावे असे प्रतिपादन माजी मंत्री अनिस अहेमद यांनी केले.

11
51 views